| सलोखा योजना काय आहे जाणून घेऊ या संपूर्ण माहिती II Sakhola Yojana Maharashtra Gov. |
सलोखा योजना काय आहे जाणून घेऊ या संपूर्ण माहिती ।शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी
महाराष्ट्र। शासन ,महसुल व वन विभाग यांच्या कडील शासन निर्णय क्रमांक :- मुद्रांक – 2022/ प्र. क्र 93 / म -1 धोरण Sakhola Yojana Maharashtra Gov.
दिनांक 03 जानेवारी 2023 अन्वये राज्य भरात सलोखा योजना राबविण्यात येत आहे . सदर योजने अंतर्गत एका
शेतकऱ्याच्या नावा वरील शेत जामीन चा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरील
शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे 12 वर्षपासून असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी
मुद्रांक शुल्क नाममात्र रु. 1000/- व नोंदणी फी नाममात्र रु.1000/- आकारण्या बाबत सवलत देण्यात आली आहे.
योजने चे फायदे
1 ] शेत 1 शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमीन धारकांच्या जमिन अडलंबदली नंतर ज्याचे त्याचे नावे होतील.
2] शेतजमिनीचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर . शेततळे . पाईपलाईन, वृक्ष व फळबाग
लागवडीसाठी शासनाच्या विविध योजनेचा फायदा होऊ शकतो.
3] शेतकऱ्याचे आप आप सतील वादा मुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात. वाद मिटल्यास शेतजमिनीच्या
लागवडीसाठी खालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल.
4] सखोला योजना राबवली तर अशा परस्पर विरोधी ताब्या बाबत असलेले विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली लागतील.
नोट :- समाजातील शेत जमीन मालकी हक्कांबाबत होणार वाद कमी करण्यासाठी सखोल योजनेचा
जास्तीतजास्त शेकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी शेकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे .