Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होणार – आदिती तटकरे यांची मोठी घोषणा!
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी १५०० रुपये असे एकूण ३००० रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. ७ मार्च २०२५ पर्यंत ही रक्कम खात्यात वर्ग केली जाईल, असं तटकरे यांनी सांगितलं.
महिला दिनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना खास भेट!
महिला दिनाच्या आधीच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे २४ तारखेदरम्यान लाभार्थींना मिळाले होते. पण फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली.

लाडक्या बहिणींसाठी मोठा निधी मंजूर!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी ३४९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्यात २ कोटी ४६ लाख महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला होता. मात्र, पात्रता पडताळणीदरम्यान काही महिलांची नावे वगळली गेल्याने फेब्रुवारी-मार्चचा लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या थोडी घटली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष:
✔ महाराष्ट्राची रहिवासी असावी.
✔ विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र.
✔ २१ ते ६५ वयोगटातील महिलांना लाभ मिळेल.
✔ लाभार्थीचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे.
✔ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
योजनेचा हप्ता लवकर मिळणार!
महिला दिनाच्या निमित्ताने मार्च महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार असून, महिलांच्या सन्मानासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना आर्थिक पाठबळ मिळावं, हा यामागचा उद्देश आहे.


