यवतमाळ : राज्यात पोलिस पाटलांची 8 हजार पदे रिक्त असून कार्यरत पाटलांवर दोन ते तीन गावांचा अतिरिक्त भार आहे. किमान ₹40 हजार मानधन, 65 वर्षांची वयोमर्यादा व रिक्त पदांची भरती करण्याची मागणी पोलिस पाटील संघटनेने गृहमंत्र्यांकडे केली आहे.

इतका मोठा भार असूनही पोलिस पाटलांना शासनाकडून मिळणारे मानधन वेळेवर दिले जात नाही. शिवाय वारंवार होणाऱ्या बैठका, दौरे यासाठी लागणारा पेट्रोल खर्च, तसेच वही, कागद यांसारख्या आवश्यक साहित्याची वेळेवर पूर्तता होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या सर्व बाबींचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेने थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी आपली व्यथा मांडली. या चर्चेदरम्यान संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष रविंद्र डोहीफोडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या पायाभूत रचनेत पोलिस पाटलांचा महत्त्वाचा वाटा असून, त्यांच्या मागण्या गांभीर्याने न घेतल्यास ग्रामीण भागातील पोलिस यंत्रणा अधिकच दबावाखाली येईल, अशी चेतावणी संघटनेने दिली आहे.
प्रमुख मागण्या Police Patil
पोलिस पाटलांना किमान 40 हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे. सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवावे. नव्याने नियुक्त झालेले पोलिस पाटील उच्चशिक्षित असल्याने त्यांना कर्मचार्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी. तसेच पोलिस पाटलांना 10 हजार रुपये निवृत्तीवेतन मंजूर करावे, सेवानिवृत्तीनंतर पात्र पाल्यांना सेवेत सामावून घ्यावे आणि रिक्त पदांची तातडीने भरती करावी, अशा प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या पोलिस पाटलांची संपूर्ण गावनिहाय यादी व संपर्क क्रमांक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.



