ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon ने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीच्या नियोजनानुसार 2025 च्या सुरुवातीपर्यंत 14,000 मॅनेजर्सना नोकरी गमवावी लागू शकते. ही कपात कंपनीच्या खर्च कपात मोहिमेचा भाग असून, यामुळे Amazon सुमारे 2.1 ते 3.6 अब्ज डॉलर वाचवू शकते.
का घेतला हा निर्णय?
Amazon चे CEO अँडी जेसी यांच्या नेतृत्वाखाली कंपनी व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात येत आहेत. त्यांच्या नव्या धोरणांनुसार, कंपनीतील प्रबंधकीय पदे कमी करून अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार केला जात आहे. यामुळे संस्थेतील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत वेग येईल आणि कार्यक्षमता वाढेल, असा कंपनीचा दावा आहे.
कोणावर पडणार परिणाम? Amazon Layoffs
या निर्णयामुळे Amazon च्या संपूर्ण ग्लोबल मॅनेजमेंट टीमवर परिणाम होईल. सध्या कंपनीत 1,05,770 मॅनेजर्स आहेत, पण कपातीनंतर ही संख्या 91,936 पर्यंत घटणार आहे. म्हणजेच, एकूण व्यवस्थापक वर्गातील 13% कपात केली जाणार आहे.
AI आणि ऑटोमेशनचा वाढता प्रभाव? Amazon Layoffs
Amazon कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनवर अधिक भर देत आहे, ज्यामुळे अनेक मॅनेजर्सची गरज कमी होत आहे. कंपनीने ‘ब्युरोक्रेसी टिपलाइन’ नावाचे एक नवीन तंत्रज्ञान सुरु केले आहे, जिथे कर्मचारी व्यवस्थापनातील त्रुटी आणि अनावश्यक प्रक्रियांची तक्रार करू शकतात.
मॅनेजर्ससाठी नवीन नियम काय?
कंपनीने मॅनेजर्ससाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत:
- वरिष्ठ पदांवरील भरती थांबवण्यात येईल.
- मॅनेजर्सच्या थेट रिपोर्टिंग स्टाफची संख्या वाढवली जाईल.
- वेतन पुनरावलोकन प्रक्रिया कठीण केली जाईल.
कर्मचार्यांसाठी धोक्याची सूचना? Amazon Layoffs
गेल्या काही वर्षांपासून Amazon मध्ये सातत्याने कर्मचारी कपातीचे सत्र सुरू आहे. 2022-23 मध्येच कंपनीने 27,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी केले होते. ही नवीन कपात मॅनेजमेंट स्तरावर असल्याने, कर्मचार्यांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.
Amazon मधील नोकरी सुरक्षित आहे का?
कंपनी व्यवस्थापनातील ही मोठी पुनर्रचना असली तरी, AI आणि ऑटोमेशनशी जुळवून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संधी वाढू शकतात. तरीही, मॅनेजर्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे, कारण भविष्यात आणखी कपातीची शक्यता नाकारता येत नाही.
तुमच्या मते Amazon चा हा निर्णय योग्य आहे का? खाली कंमेंटमध्ये सांगा! Amazon Layoffs


